उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मराठवाडय़ातील प्रसिद्ध संत श्री सद्गुरु गणेशनाथ महाराज यांचा त्रिशतकोत्तर संजीवन समाधी सोहळा (वर्ष ३७५ वे) चालू आहे. याच मालिकेत उजनी येथे  संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार व सामाजिक चळवळीतील सक्रिय  असलेले प्रा. सोमनाथ लांडगे यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

 प्रा. सोमनाथ लांडगे यांनी श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील अभंगावर ऑनलाइन प्रवचन सेवेच्या माध्यमातून संत-साधू-महात्म्यांचे अनमोल विचार जन सामान्यत पोहचवून सर्वसामान्याच्या सामाजिक व आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त कार्य केले म्हणून श्री गणेशनाथ सेवा मंडळ, उजनी यांनी या वर्षीच्या कार्तिकी यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यात  विशेष प्रवचनकार म्हणून शाल, श्रीफल व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री धनराज पाटील, सचिव श्री देवीदास पाटील, उपाध्यक्ष गोरोबा रेवणे, श्रीकांत ढवण, ह.भ.प. योगिराज महाराज वळके, दादा महाराज सोनटक्के, वारकरी संप्रदायातील मान्यवर व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. 

 प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या या सन्मान बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top