तुळजापूर / प्रतिनिधी- 

 येथील  भीमनगर भागातील नगरपरिषद  परिषदे वतीने करण्यात  आलेल्या नाली स्लब काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असून स्लॅब जाडी कमी  करून काम करण्यात आले. याकामात निकृष्ठ दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात आले असून सदरील काम अंदाज पत्रकानुसार झाले कि नाही याची तपासणी  करुन  संबंधितांनवर,  कार्यवाही करण्याची मागणी भिमनगर भागातील रहिवाशी यांनी जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 तसेच तात्काळ गुणवत्ता तपासणी करुन सदर काम हे अंदाज पत्रकानुसार असल्याची शहानिशा झाल्याशिवाय संबंधीत ठेकेदारास कोणतेही बील अदा करण्यात येवु नये. तसेच सदर कामात दोषी असणाऱ्यावर व शासनाचा पैसा हडप करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


 
Top