उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर येथील रहिवाशी नितीन पाटील यांचे दि.३ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथील  खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. वडगाव सिद्धेश्वर येथील माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख, गेली ३० वर्षे वडगाव सिद्धेश्वर व परिसरातील राजकीय व सामाजिक धार्मिक क्षेत्रात आपला नावलौकिक कमावणारे काळाच्या पडद्याआड गेले 

     त्यांच्या निधनाची वार्ता समजतात वडगाव सह पंचक्रोशीतील जनता शोकाकूल झाली आहे वडगाव सिद्धेश्वर मंदिरासमोरील त्यांच्या शेतात दि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top