तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र  विविध जागा रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जागती,तेर,कोळेकर वाडी,बुकनवाडी,पानवाडी,म्होतरवाडी,पळसप,भिकार सारोळा,घोगरे वाडी,काजळा,रामवाडी,वाणेवाडी,डकवाडी,दाऊतपूर,इलाऺ,भंडारवाडी आदि गावे येतात. प्राथमिक आरोग्य केंद्र  जागजी येथे एक आरोग्य सेविका पद व एक शिपाई पद रिक्त आहे.तर आरोग्य सहाय्यीका यांची प्रतिनियुक्ती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.  पळसप येथील उपकेंद्रात एक पुरुष आरोग्य सेवक पद रिक्त आहे तर तेर उपकेंद्रात लोकसंख्या लक्षात घेता एक आरोग्य सेवक पूरूष पद भरणे आवश्यक आहे.  जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने बारकाईने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


 
Top