उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अामदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी जो लढा दिला तो कौतुकास्पद आहे. ते कोणत्याही पक्षात असले तरी शेतकऱ्यांचे कैवारी असल्यामुळे पीक विमा कंपनी, कृषी अिधकारी व अामदार कैलास पाटील यांची संयुक्त बैठक आपण लवकरच लावणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

 पंढरपूर येथील कार्यक्रम आटोपून कृषीमंत्री सत्तार औरंगाबादकडे जात होते. यावेळी उस्मानाबाद येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सत्तार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने २०२० खरिप हंगामातील सर्व शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कंपनीला विमा रक्कम देणे अपरिहार्य आहे. जिल्हा बँकेत हप्ता भरलेल्या संबंधित शेतकऱ्यांना कागदपत्राच्या मुद्द्यावरून विमा नाकारला असल्यास न्यायालयाच्या निर्णयानुसार असे कंपनीला करता येणार नाही. संबंधित सर्व शेतकऱ्यांनाही विमा देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता सरकार घेत आहेत.नुकतीच केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्याशी आपली चर्चा झाली असून एनडीआरफचे निकष बदण्याची मागणी आपण केली असल्याचे ही त्यांनी सांगितले. 

मंत्री अब्दुल सत्तार यांनी आतापर्यंत कोणत्याही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी इतका निधी दिला नाही तितका अधिक निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दिला आहे. गोगलगायीमुळे नुकसान झाल्यामुळे सुरुवातीला ९७ कोटी नंतर सततच्या पावसामुळे ७६४ कोटी तर ५० हजार प्रोत्साहन अनुदानापोटी ३५०१ कोटी निधी उपलब्ध केला आहे. भूविकास बँकेतील कर्जदाराचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्याचे पुत्र आहेत. ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत. त्यांना शेतीतील चांगले ज्ञान असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सिल्लोड सभेचा वाद

सिल्लोड येथे श्रीकांत शिंदे व आिदत्य ठाकरे यांची एकाच दिवशी सभा आहे. कांही वृत्त वाहिन्यावर आिदत्य ठाकरे यांना सभेसाठी परवानगी दिली नसल्याच्या बातम्या आल्या. परंतू यात सत्यता नाही, ज्या ठिकाणी आमची सभा आहे. ती जागा सोडून आदित्य ठाकरे यांनी दुसरी कोणतीही जागा मागितल्यास त्यांना उपलब्ध  करून देण्यात येईल, असे प्रशासनाने त्यांना सांगितले आहे. त्यामुळे यात वाद असल्याचे कांही कारण नाही. आदित्य ठाकरे यांच्या सभेला आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी िटप्पणी ही सत्तार यांनी केली.  


 
Top