तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संविधान दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला, यावेळी मेजर डॉ वाय.ए.डोके यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ बी डब्ल्यू गुंड यांनी संविधान आणि भारतीय समाज या विषयावर आपले विचार व्यक्त केले,तसेच यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एम आर आडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण यांनी मानले, यावेळी डॉ एस एम देशमुख , डॉ ए.बी गायकवाड, डॉ एन बी काळे , ग्रंथपाल दिपक निकाळजे,प्रा जी व्ही बाविस्कर, डॉ सी आर दापके, डॉ एफ एम तांबोळी,प्रा आशपाक आतार यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला. 


 
Top