वाशी  / प्रतिनिधी-

 कळब येथील  शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर  महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र विभागात कार्यरत असलेल्या वाशी येथील डॉ. मजहरोद्दीन मुमताजमियां काझी यांना भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. त्यांनी “आयओटी तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य तपासणी” या विषयावर त्यांचे संशोधन सादर केले होते.

 यासाठी त्यांना डॉ. झुलेखा बीवी, केरळ विद्यापीठ, डॉ. अजय भामरे, मुंबई विद्यापीठ, डॉ. अर्चना साळवे, पुणे विद्यापीठ यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. अशोक मोहेकर,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, डॉ. जाधव, डॉ. गुंड्रे, डॉ. दीपक सूर्यवंशी, डॉ. केदार काळवणे, डॉ. संदीप महाजन, डॉ. संजय सावंत, डॉ. जयवंत ढोले, श्री. अरविंद शिंदे व इतर शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले.


 
Top