तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील किलज येथील जिल्हा परिषद शाळा येथील इयत्ता पाचवी वर्गातील एकूण ३ विद्यार्थी   हे शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.

 जिल्हा परिषद शाळेतून स्वराली राजेश गायकवाड ( १९४ गुण), संस्कार शरद शिंदे ( १६८ गुण), तसेच अभिषेक विजय शिंदे ( १५२ गुण) घेऊन पात्र झाले आहेत.यशस्वी झालेल्या गुणवंतांचा किलज येथील जिल्हा परिषद  शाळेत सत्कार  करण्यात आला. या विद्यार्थ्याना परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या रेखा नारायणकर  यांनी मार्गदर्शन केले.

  या कार्यक्रमासाठी शाळेतीलमुख्याध्यापक दिलीप शिंदे , शिक्षक सहदेव माळी, रणधीर जिरगे ,प्रदीप मोरे,संभाजी मसेकर,डिगंबर ताकमोगे, सह शिक्षिका भारतबाई नकाते यांच्यासह शिक्षक तसेच  विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top