कळंब   / प्रतिनिधी-

  कळंब येथे दिवाळी च्या स्वागतासाठी स्वर मैफिल कार्यक्रमाचे प्रतिवर्षी आयोजन केले जाते या कार्यक्रमात देश विदेशात आपल्या शास्त्रीय व सुगम गायनाने ज्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे अशा नामवंत गायकांना गायनासाठी पाचारण केले जाते व हा स्वर उत्सव साजरा केला जातो. एक प्रकारे ही शास्त्रीय  व सुगम गीतांची ही मेजवानी रसिक श्रोत्यासाठी असते  यावर्षी कलोपासक मंडळाच्या वतीने  स्वर्गीय कमलाकरराव जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता विठ्ठल मंदिर येथे करण्यात आले आहे, या संगीत स्वर मैफिलीमध्ये पुणे येथील विख्यात गायक पंडित आनंद भाटे  यांचे  शास्त्रीय सुगम गायन होणार आहे, त्याला  साथ संगत प्रसिद्ध तबलावादक भारत कामत यांची तर संवादिनी साथ राहुल गोळे यांची असणार आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कलोपासक मंडळाच्या वतीने यशवंत दशरथ, अनिल कुलकर्णी यांनी केली आहे

 
Top