उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महास्वयंम वेबपोर्टलवर ज्या आस्थापनामध्ये 25 पेक्षा जास्त मनुष्यबळ आहे, त्या सर्व आस्थापनांनी ( खाजगी व सार्वजनिक क्षेत्र ) महास्वंयम वेबपोर्टलवर सेवायोजन कार्यालये (सक्तीने रिक्तपदे अधिसूचित करण्यास भाग पाडणे) कायदा 1959 आणि त्या अंतर्गत नियमावली  1960 पारीत केली आहे.  त्या कायद्यांतर्गत आपल्या आस्थापनेची नोंद महास्वयंम पोर्टलवर करणे बंधनकारक आहे.

 तसेच विहीत विवरणपत्र E.R.1 प्रत्येक वर्षांच्या 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर या विहीत तारखा असतील आणि सर्व संबधित आस्थापना, उद्योजकांनी त्यांच्याकडील विवरणपत्र E.R.1 ची माहिती प्रत्येक तिमाही अखेर ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय (खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत आस्थापना) यांनी त्यांच्याकडील रिक्त पदे महास्वयंम पोर्टलवर अधिसूचित करुन भरती करण्यात यावी. ज्या आस्थापना वरील प्रमाणे कार्यवाही करीत नसतील, तर अशा आस्थापनांना CNV ॲक्ट 1959 च्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

 तरी जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय यांनी महास्वंयम पोर्टलवर नोंद करणे आणि त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे. 

 
Top