उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ राजाभाऊ गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ धनंजय पाटील यांच्या जागी डॉ गलांडे असणार असून डॉ पाटील यांना कोणतीही पदस्थापना न दिल्याने त्यांना लातूर उपसंचालक कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे. डॉ गलांडे यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे कोरोना संकट काळात जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहिले होते मात्र त्यांच्या जागी डॉ धनंजय पाटील यांना नेमण्यात आले. मनमिळावू, दांडगा जनसंपर्क व स्वतःला कामात दिवस रात्र झोकून देणारा अधिकारी म्हणून गलांडे यांनी कोरोना काळात व त्यानंतर नावलौकिक मिळवीला आहे. 

 डॉ गलांडे यांचे कार्य उत्कृष्ट असतानाही त्यांना त्याच कार्यालयात पदस्थापना देण्यात आली व खच्चीकरण करण्यात आले मात्र अखेर त्यांना व त्यांच्या कार्याला न्याय मिळाला असून ते पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक पदी रुजू झाले आहेत.

 आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गतिमान करण्याचा प्रण केला असून त्याअनुषंगाने अनेक प्रशासकीय बदल केले आहेत, मंत्री सावंत यांनी गलांडे यांना काम करण्याची संधी दिली आहे..

 
Top