कळंब  / प्रतिनिधी-    

उस्मानाबाद, बिड व लातुर या तिन्ही जिल्ह्याची तहान भागवणारा मांजरा प्रकल्प असून धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन दोन दरवाज्यातून  ४९.४८ क्यमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

मराठवाड्यात उस्मानाबाद-बीड जिल्ह्याच्या सिमेवर सन १९८० साली बांधण्यात आलेले आहे. या धरण परीक्षेत्रात जास्त पाउस झाला व हे धरण भरले तर या धरणाच्या लाभक्षेत्रात ९० की.मी.चा डावा कालवा व ७८ की.मी. चा उजवा कालवा याच्या माध्यमातून १८२२३ हेक्टर एवढ्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी पाणी पूरवठा करण्यात येतो.

बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील येथून पाणी पुरवठा करण्यात येत आहे लातूर शहर, औद्योगिक वसाहत,कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, मुरूड आदी शहरासह अनेक गावांतील लाखो लोकांची तहान या धरणावर भागत आहे. मांजरा खो-यातील पाटोदा, बीड, केज, भूम, कळंब आदी तालुक्यातील विविध गावात पावसाने दमदार पाऊस बसल्यामुळे मांजरा नदी प्रवाही झाली होती. मागील आठवडय़ात मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे वरच्या बाजूला असलेले २६ लहान - मोठे तलाव व पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली होती.

दिनांक १४ अॉक्टोबर रोजी रात्री धरण भरण्याचा अंदाज होता. परंतु पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची आवक मंदावली होती. अखेर धरणे १००% टक्के भरले आहे. पाण्याची आवक चालुच असल्यामुळे धरणाचे दोन दरवाज्यातून विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे.


 
Top