उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

 2020 खरीप हंगामाचे उर्वरित 330 कोटी, 2021 चे उर्वरित 50 टक्के 388 कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे नुकसानभरपाई अनुदान 248 कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांचे मागील 4 दिवसापासून उपोषण चालू असून अद्याप झापेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग आलेली नाही. मागण्या पुर्ण करण्यासाठी तसेच आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 आळणी चौक येथे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सदर महामार्गावर वाहतुक कोंडी होवून महामार्गावरचे दळणवळणे ठप्प झाले होते.

 पीकविमा खरीप हंगाम 2020 चे 330 कोटी 2021 चे उर्वरित 388 कोटी, नुकसान भरपाईचे अनुदान 248 कोटी रुपये तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा तसेच पीकविमा वाटप गांभार्याने घ्यावे न घेतल्यास गांधीगिरी न करता यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा सजड इशारा रास्ता रोको आंदोलनासमयी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला. तसेच शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने जिल्हाभरात वरील मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलन करावे यासंबंधी सुचना दिल्या.

 याप्रसंगी नंदु राजेनिंबाळकर, विजय सस्ते, सतिषकुमार सोमाणी, संग्राम देशमुख, वैभव वीर, सोमनाथ आप्पा गुरव, पप्पु मंडे, अमोल मुळे, गजेंद्र जाधव, भैय्यासाहेब काकडे, काका शिनगारे, प्रविण कोकाटे, संताजी पाटील, विनोद थोडसरे, तानाजी जमाले, धनंजय वीर, सचिन शेळके, आण्णा जेटे, नानासाहेब बोंदर, सागर बाराते, रामहरी मुंडे, राकेश सुर्यवंशी, अजय नाईकवाडी, पांडुरंग माने आदींसह हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.


 
Top