उस्मानाबाद / प्रतिनिधी-

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन चरित्र साहस, धैर्य व पराक्रमाने ओतप्रोत भरलेले असून  तरुणांसाठी ते अत्यंत प्रेरणादायी आहे’, असे उद्गार प्रख्यात वक्ते, लेखक,इतिहास अभ्यासक  श्री पार्थ बावस्कर यांनी काढले. जनजागृती मंडळ धाराशिव व व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहसी सावरकर या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव ॲड. मिलिंद पाटील, श्री कमलाकर पाटील, शेषाद्री डांगे, जनजागृती मंडळाचे श्री गोपाळ व्यास हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना  पार्थ बावस्कर यांनी सावरकरांचे जीवन चरित्र व त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांनी सावरकरांकडून राष्ट्रभक्ती, साहस, धैर्य, चिकाटी हे गुण घेतले पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर अनेक दाखले देत त्यांनी  उभे केले.. आपल्या व्याख्यानात त्यांनी विविध काव्यपंक्तीचा वापर करून अनेक पराक्रमांचे दाखले त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोपाळ व्यास यांनी या व्याख्यानाच्याआयोजनामागील भूमिका विषद केली व वक्ते बाविस्कर यांचा परिचय करून दिला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना करताना ॲड. मिलिंद पाटील म्हणाले की, सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी खूप मोठे बलिदान केलेले आहे. तरुणांनी अशा क्रांतिकारकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर नेहमी ठेवला पाहिजे.  कार्यक्रमात  प्रा. लक्ष्मीकांत देशमुख यांनी सावरकरांचे ‘अनादी मी अनंत मी  ‘ हे गीत सादर केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


 
Top