उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राद्वारे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हास्तरीय भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भरती मेळाव्यास गुजरात येथील सुझुकी प्रा.लि.चे प्रतिनिधी रणजित सिंग, एच आर उप‍स्थित राहणार आहेत. तरी ज्या आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यांनी सर्व मूळ शैक्षणिक दस्तावेज तसेच त्या दस्ताऐवजांच्या दोन झेरॉक्स प्रती घेवून दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहून भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अंशकालिन प्राचार्य सोमेश्वर वाघमारे तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.एस.कदम यांनी केले आहे.


 
Top