उस्मानाबाद /प्रतिनिधी-

गणेशोत्सव व नवरात्र महोत्सवात उत्कृष्ठ कार्य करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवल्याबद्दल तसेच क्लीष्ट गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना गजाआड केल्याबद्दल पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या प्रती कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभ पोलिस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला .  

शुक्रवारी (दि.7) सकाळी साडेअकरा वाजता आयोजीत कार्यक्रमात पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांचा सत्कार  करण्यात आला . त्यांनी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवली तसेच महत्वाच्या प्रकरणातील गुन्हेगांराना गजाआड केल्याबद्दल हा कृतज्ञता सोहळा आयोजीत करण्यात आला होता .

 यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, आरती जाधव, शैलेश पवार या पोलिस अधिकार्‍यांचाही सत्कार करण्यात आला .

यावेळी  केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे, काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रशांत पाटील, दिनेश वाबळे, पत्रकार उपेंद्र कटके  उदय निंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष शिंदे, जैन समाज संघटनेचे अध्यक्ष उल्हास चाकवते, शिवसेनेचे तुषार निंबाळकर, पत्रकार महेश पोतदार, कुणाल गांधी, शिवसेनेचे पंकज पाटील, दौलत निपाणीकर , गोविंद पाटील ,  आदित्य हंबीरे , सलीम पठाण आदींची उपस्थिती  होती . या कार्यक्रमाचे आयोजन पारस मेडीकेअर पॉईंटच्या सौ. रेखा पवार यांच्यावतीने करण्यात आले होते

लहान गुन्ह्याची नोंद नाही

१० हजाराच्या आत गुन्हे घडल्यास लहान-सहान गुन्ह्याची नोंद पोिलस स्टेशनमध्ये करण्यात येत नाही. तक्रारी अर्ज घेऊन गेल्यास साहेबांना विचारावे लागेल, असे सांगितले जाते. एकीकडे सामािजक बांधिलकी मानुन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी काम करत असतानाच कांही पोिलस ठाण्यात मात्र लहान-सहान चोरी प्रकरणी गुन्हे नाेंद होत नसल्याबद्दल अर्श्चय व्यक्त केले जात आहे. 

 
Top