उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील येरमाळा येथे नवरात्र महोत्सवानिमित्त येडेश्वरीला पाचव्या माळेदिवशी (दि.30) येथील व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने व राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या उपस्थितीत भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

प्रत्येक वर्षी पाचव्या माळेला संजय पाटील दुधगावकर हे येरमाळा येथे येडेश्वरी देवीस खेटा मारण्यासाठी जातात. त्यानुसार यावर्षीही ते गेले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत येथील व्यापर्‍यांनी एक हजार भाविकांना सफरचंद व डिंग लाडूचे वाटप केले. यावेळी बालाजी बारकुल, सुधीर लोमटे, संतोष बारकुल, तानाजी बारकुल, राजाभाऊ निचळे, दत्तप्रसाद डाळे, दिनेश पलंगे यांच्यासह हायवे चौकातील येडश्वरी मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. यावेळी संजय दुधगावकर यांनी येथील भाविकांसाठी उपचारासाठी असलेल्या रुग्णसेवेस भेट देवून माहिती घेत समाधान व्यक्त केले

 
Top