तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट अंतर्गत बोरमन तांडा येथे सिमेंट रस्ता कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेअंतर्गत बोरमन तांडा येथे सिमेंट रस्त्यासाठी पाच लाख रुपये मंजूर झालेल्या कामाचे आज दि.23ऑक्टोबंर 2022 वार रविवार रोजी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रा.प.सदस्य प्रशांत नवगिरे, उपसरपंच पती बसवराज कवठे,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महेश कदम, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजु पाटील,ग्रा.प.सदस्य अंकुश लोखंडे, सुनील माने, किशोर पाटील,गोरसेनेचे तालुकाध्यक्ष राजु चव्हाण, प्रेमनाथ चव्हाण, सुभाष राठोड,राजु राठोड,गोपा राठोड, गुलाब राठोड,किसन राठोड ,राजू राठोड,प्रदीप राठोड, अनिल राठोड,आर.बी.टेलर, लोकू राठोड, श्रीनिवास राठोड आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top