उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील माय भूमी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि.२५) रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्रशाला येथे भव्य रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 दहिवडी येथील युवकांनी एकत्रित येऊन माय भूमी सोशल फाउंडेशन ची निर्मिती केली ,याच माय भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत, यंदा माय भूमी फाउंडेशन आणि  राम दीक्षित (उपअभियंता महावितरण लोहारा) यांच्या वतीने रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्या आहे आयोजित रक्तदान शिबिर आणि सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन अतुल गाटे यांनी केले आहे.


 
Top