तुळजापूर/ प्रतिनिधी-

 दिपावली व सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर  तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी  शुक्रवार पासुन देविदर्शनार्थ भाविकांची तुफान गर्दी होत आहे. शुक्रवार व शनिवार दोन दिवसात चार लाख भाविकांनी देवीदर्शन घेतले.

भाविकांच्या वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर नियोजन,कोलमडल्याने याचा भाविकांना मोठा ञास सहन करावा लागला मुलभुत  साध्या स्वच्छतागृहाची ही मुलभुत   सुविधा घ्यावी लागल्यामुळे तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत करण्यात आलेल्या ३००कोटी रुपये विकास कामांचा बाबतीत भाविकांन मधुन प्रश्न विचारला जात असुन या कामांची गुननियञंक पथका मार्फत  चौकशी करुन निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदार व संबधित अभियंते यांच्यावर गुन्हे   दाखल करण्याची मागणी ञस्त भाविकांन मधुन केली जात आहे.  भाविकांची वाढतीगर्दी पाहुन  देवीदर्शन १ नोव्हेबर २०२२पर्यत सलग  २२ तास सुरू ठेवण्यात आले.

 न.प पाणीपुरवठा विद्युत पुरवठा कनेक्शन पुन्हा कट 

 नगरपरिषदच्या ढिसाळ कारभारामुळे नगरपरिषद पाणीपुरवठ्याची थकबाकी पोटी महावितरण ने पाणीपुरवठा विद्युत प्रवाह खंडीत केल्याने शनिवार पासुन लाखोच्या संख्येने  भाविक तिर्थक्षेञी दाखल होत असताना  शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असुन पाणी विकत घेऊन वेळ भागवावी लागत आहे.

 
Top