उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्थापना 15 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. या घटनेला 90 वर्षे पूर्ण झाली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय  वसतिगृह या शासकीय वस्तीगृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग वर्धापन दिन विविध उपक्रमांचे आयोजन करून  उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज,म. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच शासकीय वसतीगृहाच्या ग्रंथालयातील उपलब्ध असणाऱ्या ग्रंथालयात ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग वर्धापन दिनाच्या उपक्रमाच्या आयोजनातील एक भाग म्हणून वाचन प्रेरणा दिन ही साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने तज्ञांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले. प्राध्यापक डॉ. विकास सरनाईक सर (इतिहास अधिविभाग, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद )हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना व्याख्यानातून अनमोल मार्गदर्शन केले. समाजसुधारकांचे कार्य लक्षात घेऊन आपणही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. सर्वांनी वाचनासाठी प्रेरित झाले पाहिजे आणि वाचन केले पाहिजे. जेणेकरून  या देशातील लोकशाही बलवान होईल आणि राष्ट्र प्रगतीपथावर जाईल, असे विचार डॉ.सरनाईक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.नाईकनवरे बप्पा अर्जुन (वसतीगृह अधीक्षक )हे होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वसतीगृह प्रवेशित विद्यार्थी चंद्रकांत सरवदे याने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या शासकीय वसतीगृहाचे  चव्हाण बी. एस.,राठोड एस.एच., अमर बनसोडे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग वर्धापन दिन विविध उपक्रमांनी या शासकीय वस्तीगृहात साजरा करण्यात आला.


 
Top