तुळजापूर  / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेच्या गाभारा चांदीच्या पञ्याने मडवणे, तुळजाभवानी प्रसाद व तुळजापूर विकास आराखडा या बाबतीत विश्वस्त तथा आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवार दि. १७रोजी मंदीर प्रशासन कार्यालयात  तिन्ही पुजारी मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद  साधुन चर्चा केली व या प्रकरणी आपल्या सुचना लेखी स्वरुपात श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानकडे सादर करण्याचे आवाहन  बैठकीत केले.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रथम बैठकीचे उद्दिष्ट सांगितल्या नंतर प्रथम मंदीर गाभारा चांदी किंवा सोने पञाने मडवणे यावर चर्चा सुरु झाली यात देविजीचे मुख्य सिंहासन आहे त्याचा खालचा भाग हा पुरातन व  अतिशय  महत्त्वाचा असुन येथे चलयंञा सह अनेक देवदेवतांचा  स्थापना मुर्त्या   असुन त्यास हात न लावता   खांबापासुन वरील बाजुला तसेच गर्भगृहाचा सर्व बाजूला चांदीच्या किंवा सोन्याचा पञा बसवावा अशी सुचना आली. गर्भगृहात २०००साली येथील चांदीचा पञा बदलला होता,असे यावेळी सांगण्यात आले .  यात गर्भगृहातील भिंतीवर  फरशीचे अनेक थर असुन पुरातण वास्तुला इजा न पोहचता हे थर काढुन मगच त्यावर पञा मढवावा हे काम पुरातत्व विभागाच्या परवानगी ने करावे, असे यावेळी सांगण्यात आले 

भाविकांना देवीचा प्रसादा बाबतीत पंचखाद्य लाडू व नारळ फोडलेला प्रसाद देण्या बाबतीत चर्चा झाली. तुळजापूर विकास अराखड्यात स्वच्छता गृहाची कमतरता यावर चर्चा झाली ते वाढवावे अशी सुचना यात केली गेली  तसेच सुलभ समान दर्शन, व्हीआयपी दर्शन, पेड दर्शन, देणगी दर्शन यासह अनेक विषयावर यात चर्चा झाली . या बाबतीत सर्वांना विश्वासात घेवुन सर्वांचा सुचनांचा विचार करुन  तुळजापूरचा आराखडा केला जाईल, असे शेवटी आ. राणजगजितसिंह पाटील यांनी  सांगितले . यावेळी मंदीराचे प्रमुख अधिकारी अभियंते सह पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके, भोपे मंडळ अध्यक्ष अमर परमेश्वर, उपाध्य मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो सह तिन्ही मंडळाचे त्यांचे सहकारी  पदाधिकारी उपस्थितीत होते. 

 
Top