उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारा संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उस्मानाबाद या शासकीय वस्तीगृहात सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.

   17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान शासकीय वस्तीगृहाकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांच्या कार्यक्रमांच्या आयोजनातील एक महत्त्वाचा कार्यक्रम पालक मेळावा आयोजित करण्यात आला.

  यावेळी  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बी. जी. अरवत,   बी.डी. सिरसट  हे ही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अनिल  सूर्यवंशी हे उपस्थित  होते. आपण शासकीय वस्तीग्रह या योजनेचा लाभ घेत असताना आपल्या ध्येयाप्रती इमान बाळगून आई-वडिलांचा व या शासकीय वसतिगृहाचा नावलौकिक वाढवावा असे श्री. सूर्यवंशी  यावेळी म्हणाले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृह अधीक्षक बी. ए. नाईकनवरे यांनी केले. सूत्रसंचालन वस्तीग्रह प्रवेशित विद्यार्थी प्रशांत तौर तर आभार प्रदर्शन दीपक बनसोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले. पालक मेळाव्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top