उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 २०२० चा सोयाबीनचा पीक विम्यावरुन आ. कैलास पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र विम्यापोटी २०१ कोटी रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच काही बँकांमधील खाती शेतकऱ्यांची गोठवली गेली असल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली असून येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर २०१ कोटी रक्कम वर्ग केली जाईल. ही सर्व प्रक्रिया सुरू असताना आ कैलास पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. हे  उपोषण म्हणजे एक प्रकारे स्टंटबाजी असल्याचा टोला बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज  साळुंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, गेल्या अडीच वर्षात आमदार किंवा खासदारांनी सत्तेत असताना देखील याबाबत ब्र शब्द काढला नाही, असा सणसणाटी आरोप त्यांनी केला आहे.

 उस्मानाबाद येथील बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार २२५ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत विमा कंपनीला ऑनलाईन कळविण्याची अट आहे. तर विमा कंपनीने ज्यांनी ७२ तासाच्या आत नुकसान झाल्याचे कळविले त्या शेतकऱ्यांना ८८ कोटी रक्कम दिली. मात्र ज्यांनी कळविले नाही अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे त्यांनी न्यायालयाचा मार्ग अवलंबविला. या 

अनुषंगाने जे काय आता सध्या उपोषणाची स्टंट सुरू आहे ती सर्व राजकीय स्टंटबाजी आहे. त्यामुळे त्यांनी अशा राजकीय स्टंटबाजीला शेतकरी बांधव, जनता कुठल्याही प्रकारला बळी पडणार नाही. जनता हुशार झालेली असून शेतकरी बांधव सजग झालेले आहेत. विशेष म्हणजे आपला जिल्हा पीक विम्यासाठी सगळ्यात अग्रेसर असलेला जिल्हा आहे. सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीची याचिका दाखल करून घेण्यासाठी २०० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले.  यापूर्वी विमा कंपनीने प्रथम ५६ कोटी वितरीत केले असून उर्वरित २०१ कोटी रुपये असे एकूण अडीचशे कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर उर्वरित ३३० कोटी रुपयांची लढाई शेवटच्या क्षणापर्यंत पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही सर्व माहीत असून देखील आ. पाटील यांनी हे उपोषण सुरू केले असून अशा पद्धतीने उपोषण करणे याला कुठलीही जनता, शेतकरी बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


 
Top