उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रतिवर्षी प्रमाणे राज्यात दि.31 ऑक्टोबर 2022 ते 06 नोव्हेबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयेाजित करण्यात येत आहे

 दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाने सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमूख,राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम,सहकारी संस्था,स्वायत्त संस्थांमार्फत वरील कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे.

 विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख किंवा जेष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, कर्मचारी  प्रतिज्ञा करतील.प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे आहे.

 आपल्या देशाच्या आर्थिक,राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे असे मला वाटते भ्रष्टाचार निमूर्लनासाठी सरकार,नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते.

 प्रत्येक नागरिकाने दक्ष राहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचार विरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे याची  मला जाणीव आहे.

 म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की : जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही,सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन, व्यक्तिगत वागणूकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अधिकरणास देईन.


 
Top