परंडा  / प्रतिनिधी-

शोकू राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२२ आयोजित ‘१७ व्या एस्कु इंटरनॅशनल कराटे कप’ यांच्या वतीने अहमदाबाद ( गुजरात )  येथे घेण्यात  आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत येथील संतमिरा शाळेतील कु. ओमराजे हरिदास भिल्लारे  (इ  ८ वी ) व शशांक शहाजी चंदनशिवे (इ ९ वी ) यांनी आपापल्या वयोगटातुन राष्ट्रीय स्तरावर तृतीय  क्रमांक पटकावले . वरील दोन्ही विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

शशांक शहाजी चंदनशिवे आणि ओम हरिदास भिलारे या दोघांनीही जिल्हास्तरीय स्पर्धेतून प्रथम क्रमांक राज्यस्तरीय स्पर्धेतून प्रथम क्रमांक पटकावला होता तर नुकत्याच गुजरात अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आणि आत्ता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 

   त्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांनी भरभरून कौतुक व अभिनंदन केले. शशांक शहाजी चंदनशिवे याच्या यशस्वीतेमुळे त्याचे वडील प्रा डॉ शहाजी चंदनशिवे राज्य समन्वयक फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्य ,त्याचे काका शालेय शिक्षण विभाग मंत्रालय येथील शालेय शिक्षण विभागाचे माजी सचिव सुनील चंदनशिवे , आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक ज वी पवार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर ,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव ,माजी प्राचार्य डॉ दीपा सावळे, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्ह्यातील व राज्यातील अनेक मान्यवरांनी शशांक शहाजी चंदनशिवे याचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 
Top