उस्मानाबाद  / प्रतिनिधी- 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा.ओमराजे निंबाळकर, िजल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते नाराळ पाणी पिऊन उपोषणाची सांगता केली. 

  यावेळी विरोधी पक्ष नेते दानवे यांनी आपण केलेल्या बऱ्याच मागन्या मान्य झाल्या आहेत. राहिलेल्या मागण्या आपण मंजूर करून घेऊ त्यासाठी आपली प्रकृती चांगली असणे गरजेचे आहे.    खासदार ओम राजे निंबाळकर यांनी सांगितले की, उद्या सायंकाळ पर्यंत अतिवृष्टी बाबतचे नुकसानीचे 59 कोटी 87 लाख देण्याचा शासन आदेश येईल असे सचिवानी सांगितले आहे.सततच्या पावसाबाबत नुकसानीचे 222 कोटी 87 लाख पैसे द्यावे याची  कॅबिनेट उपसमिती बैठकीत मंगळवारी निर्णय होणार त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.मागण्याप्रमाणे व शब्द दिल्याप्रमाणे कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन  सुरु करणार असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. 

 जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री यांचे आभार मानले. विमा कंपनी विरोधात न्यायालयीन लढा व इतर अधिकार पूर्णपाने वापरून विमा कंपनीवर कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला.  

शिवसेनेचा जल्लोष

जिल्हयातील शेतकऱ्यांच्या पीक विमा आनुदान अवकाळी पावसाची मदत आदी मिळुन १२०० कोटी रुपये राज्य व विमा कंपन्या यांच्याकडून येणे बाकी आहे. त्यामुळे अामदार कैलास पाटील यांचे उपोषण सुटल्यानंतर १२०० लाडू छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाटून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. 

 
Top