कळंब / प्रतिनिधी- 

आनंदऋषिजी नेत्रालय अहमदनगर यांचे वतीने बुधवार 2नोव्हेंबर  2022 रोजी  सकाळी दहा ते दोन या वेळेत

मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर महावीर भवन, कथले चौक, कळंब येथे होणार आहे

दर महिन्याच्या पहिला बुधवारी  हे शिबिर घेण्यात  येणार आहे. या  शिबिरात मोफत डोळे तपासणी करून आनंदऋषिजी  नेत्रालय येथे रूग्णांना शस्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच अल्पदरात नंबरचे चष्मे सुध्दा देण्यात येतील , तरी या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन  आनंदऋषिजी नेत्रालय अहमदनगर व जैन श्रावक संघ, कळंब  यांचे वतीने करण्यात येत आहे

अधिक माहितीसाठी किरण कवडे - 9850387427(जनसंपर्क अधिकारी) यांच्याशी संपर्क साधावा.


 
Top