तुळजापूर / प्रतिनिधी- 

  तालुक्यातील मंगरुळ सर्कलला पुन्हा एकदा धुवादार पावसाने साडेतीन तास झोडपले या झालेल्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.दिवाळी तोंडावर हा पाऊस बरसल्याने या पावसाने शेतकऱ्यांचे दिवाळ काढले अशी प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

मंगरुळ राञी १२.३०वा. मुसळधार पावसास आरंभ झाला तो साडेतीन वाजेपर्यंत मुक्त पणे बरसला यात मंगरुळ , कुंभारी,  राँकेल,भातंब्रा, यमगरवाडी सह परिसरात बरसला यात कुंभारी गावाकडे जाणाऱ्या स्मशानभूमी पुलावरुन पाणी वाहले ऐवडा प्रचंड पाऊस झाला यात सोयाबीन व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले .यात नुकसान ची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 
Top