उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

नुतन प्राथमिक विद्यामंदिर उस्मानाबाद दिवाळी सणानिमित्त इयत्ता 1ली ते 4 थीच्या सर्व वर्गामध्ये मध्ये आकाश कंदील बनवण्याचा उपक्रम स्पर्धा घेण्यात आली.

 या उपक्रमामध्ये सहभागी मुलांनी क्राफ्ट पेपर पासून तसेच घरातील सहज उपलब्ध साहित्य वापरून आकाश कंदील , दिवाळीचे भेट कार्ड व मातीच्या सुंदर पणती  तयार केल्या. तसेच इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाशकंदील शाळेच्या इमारतीला लावण्यात आले त्यामुळे शाळेतील वातावरण आनंददायी व प्रसन्न झाले. मुलांनी आकाशकंदील स्वतः बनवल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसून येत होता  

 या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक   प्रदिपकुमार गोरे सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते

 
Top