उस्मानाबाद  /प्रतिनिधी-  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरेश पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर घणाघाती टिका करताना चौकात  मारण्याची भाषा केल्याने सर्वत्र अर्श्चय व्यक्त केले जात आहे. याच कार्यक्रमात सुरेश पाटील यांनी जिल्हयात राष्ट्रवादी पक्ष संपत  आहे. पक्ष सावरण्यासाठी पार्थ पवार यांच्याकडे जिल्हयाचे नेतृत्व द्या, अशी ही मागणी केली. याला भाषात उत्तर देताना अजित पवार यांनी कोणताही पक्ष संपत नसतो, असे सांगत त्यांनी भाजपचे उदाहरण दिले. 

उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा येथे शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी अिजत पवार यांचा कार्यक्रम झाला. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे सचिव सुरेश पाटील यांनी जिल्हयातील राष्ट्रवादीची परिस्थिती कथन करताना िजल्हयातील नेतेमंडळी त्यांच्याकडे पहात होते. सुरेश पाटील यांच्या भाषणानंतर अजित पवार यांनी कोणताही पक्ष संपत नसतो, भाजपचे एक -दोन खासदार-आमदार असताना आज सत्तेत आहेत. त्यामुळे पक्ष संपल्याचे बोलू नये, असे सांगत सुनावले.  याच कार्यक्रमात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी वडिलांचे न ऐकता काम करण्याचा सल्ला दिल्याने कार्यक्रम स्थळी एकच चर्चा शुरू झाली. यावेळी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल मोटे, नंदकुमार गवारे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमानंतर सुरेश पाटील यांनी मराठा समाजाच्या मोर्चा संदर्भात मंत्री सावंत यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे लोकांत संताप आहे. आपण फक्त लोकांची प्रतिक्रिया व्यक्त केली, असा खुलासा ही व्यक्त केला. 


 
Top