उस्मानाबाद /  प्रतिनिधी-
तुळजापूर येथील रहिवाशी तथा महिला दक्षता समितीच्या अशासकीय सदस्या सौ. अलका रामभाऊ हुंडेकर (6४) यांचे अल्प-अजाराने सोलापूर येथील एका खासगी रूग्णालयात शनिवार दि.२२ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्याच्या पार्थिवावर तुळजापूर येथील स्मशानभुमीत रात्री उशीरा अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पती रामभाऊ हुंडेकर, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे .  नुकताच पोलिस विभागाच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला होता. अंत्यविधीस जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, माजी नगरसेवक अमरसिंह मगर, विशाल रोचकरी, अमर हंगरगेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.
 
Top