उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब परिसरातील नागरिकासाठी मांजरा नदी ही जीवन वाहिनी असून यावर्षी परतीच्या पावसाने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, नदीपात्र पाणी भरून वाहत आहे कळंब शहरवासीयां साठी या नदीला अन्यन्य साधारण साधारण महत्व आहे नदी पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी ही  वरदान आहे सर्वकाही नदीवर अवलंबून आहे यामुळे नदीची उपयुक्तता जीवनात महत्त्वाचे आहे नदी प्रती कृतज्ञता व्यक्त करणे सर्वांचे कर्तव्य आहे हा विचार घेऊन कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने दि.22 ऑक्टोबर धनत्रयोदशी या शुभ व मंगल दिनी जलपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी धूप, दीप, लावून, फुले अर्पण करीत नदीची आरती करण्यात आली व  जीवनात संपन्नता, स्थिरता, सुख ,समाधान लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली. कळंब शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर धनेगाव तालुका केज येथे नदीवर मांजरा प्रकल्प आहे हा प्रकल्प ही लागोपाठ तीन वर्ष भरत आहे कळंब परिसरातील नागरिकांसाठी तसेच बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व शेतीसाठी सिंचनासाठी ही नदी उपयुक्त आहे नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित  कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने उस्मानाबाद बीड जिल्हा - सीमेवरील नदी काठावर आयोजित करण्यात आला व जल पूजन करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह. भ .प महादेव महाराज अडसूळ, दक्षिण मराठवाडा प्रदेश कार्यकारणी सदस्य डी. 

के कुलकर्णी तालुका उपाध्यक्ष अॕड, त्रिंबकराव मनगिरे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष,सुरेश टेकाळे नरेंद्र महाराज सेवा समिती प्रसिद्धीप्रमुख ,विलास मुळीक, माधवसिंग राजपूत, शिवाजी गिड्डे ,संदीप कोकाटे ,सचिन डोरले ,अशोक चोंदे ,अशोक सावंत ,संतोष लोंढे यांनी सहभाग घेतला.


 
Top