उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथे करिअर मार्गदर्शन विषयावर विक्रांत जोमदे( रिस्क अँड कंपलाएन्स ऑफिसर नोवारटीस फार्मास्युटिकल, हैद्राबाद ) यांचे व्याख्यान संपन्न झाले. कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी, एलएलबी व एलएलएम नंतरच्या करिअर संधी, या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. विक्रांत जोमदे यांचे कडून डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयास कायदेविषयक ग्रंथसंपदा भेट देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमे चे पूजन करून करण्यात आली.  प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अजित शिंदे यांनी केले.

विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. व्ही. जी. शिंदे,प्रमुख पाहुणे म्हणून विक्रांत जोमदे( रिस्क अँड कंपलाएन्स ऑफिसर नोवारटीस फार्मास्युटिकलस, हैद्राबाद ) प्राचार्य डॉ.शिंदे यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि प्रा. नितीन कुंभार, प्रा. डॉ. संजय अंबेकर, डॉ.स्मिता कोल्हे, प्रा. चंदनी घोगरे,प्रा.श्रीयश  मैंदरकर ,प्रा. सोनाली पाटील, प्रा. के. पी. शिकारे , प्रा.दिपाली बारकूल  व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पूनम दगाडीया  यांनी केले.


 
Top