उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैन्य दलातील व पोलीस दलातील जवानांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी ‘पोलीस स्मृती दिन’ साजरा केला जातो. त्या अनुषंगाने उस्मानाबाद पोलीस मुख्यालय, उस्मानाबाद येथे आज दि. 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन   प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश, उस्मानाबाद श्री. किशोर पेठकर,   जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता यांना निमंत्रीत करण्यात येउन सदर कार्यक्रमास   प्रभारी पोलीस अधीक्षक   नवनीत काँवत, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्रीमती अंजुम शेख, उस्मानाबाद उप विभागाचे पोलीस उप अधीक्ष  कल्याणजी घेटे, तुळजापूर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक- श्रीमती सई भोरे- पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि-  यशवंत जाधव, राखिव पोलीस निरीक्षक   अरविंद दुबे,  पोलीस अधीक्षक यांचे वाचक सपोनि  श्रीकांत भराटे, पोलीस कल्याण विगाचे सपोनि  यशवंत बारवकर यांसह पोलीस मुख्यालयातील विविध शाखेचे पोलीस अधिकारी- अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.

  यावेळी  जिल्हा सत्र न्यायाधिश  किशोर पेठकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर   प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, “ 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख हॉट स्प्रिंग्स या सीमेवरील बर्फाच्छादीत निर्जन ठिकाणी गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांवर चिनी सैनिकांनी अमानुष हल्ला केला. यावेळी त्या भारतीय जवानांनी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या रक्षणार्थ शौर्याने शत्रुशी लढा देत असताना त्यातील 10 भारतीय जवान शहीद झाले. तेव्हा पासून त्या विरांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणुन संपुर्ण भारत देशात साजरा केला जातो. तसेच दरवर्षी कर्तव्य बजावित असताना शहिद झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची आठवण करुण त्यांना श्रध्दांजली अर्पीत करतात.” त्या अनुषंगाने दि. 01.09.2022 ते दि. 31.08.2022 या कालावधीत देशातील सैन्य दलातील व पोलीस दलातील एकुण 261 जवान यांनी आपले कर्तव्य बजावत असताना मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणुन पोलीस मुख्यालय आवारातील हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच उपरोक्त कालावधीतील शहिद जवानांच्या नावाचे वाचन पोलीस उप अधीक्षक  कल्याणजी घेटे व श्रीमती सई भोरे- पाटील यांनी व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सपोनि- श्रीकांत भराटे यांनी तर परेडचे नेतृत्त्व राखीव पोलीस निरीक्षक- श्री. अरविंद दुबे यांनी केले. याबरोबरच प्रमुख अतिथी व  पोलीस अधीक्षकांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शहिद जवानांच्या व कोरोना काळत शहिद झालेल्या जवानांच्या उपस्थित कुटूंबीयांच्या भेटी घेतल्या.

 
Top