उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करुन अशा नवीन वाहनांची नोंदणी होऊन वाहनमालकास वाहनाचा ताबा मिळावा याकरिता दि.22 आणि 23 ऑक्टोबर 2022 रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणी आणि त्याअनुषंगाने शासकीय महसूल जमा करण्याचे कामकाज सुरु ठेवण्याचे राज्याचे परिवहन उपआयुक्त (प्रशासन) विवेक भिमनवार यांनी निर्देश दिले आहेत.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व जनतेसाठी दि.22 आणि 23 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सार्वजनिक सु्ट्टीच्या दिवशी वाहन नोंदणी आणि कर वसुलीचे कामकाज सुरु राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.जाधव यांनी केले आहे.

 
Top