उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी फार्मसी इन्स्टिट्यूट उस्मानाबाद यांच्या  वतीने शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद यांच्या सहकार्याने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबादचे सरचिटणीस सौ प्रेमाताई सुधीर  पाटील   यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  दि 18/ 10 /22 रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सौ. विना पाटील अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व डॉ सावंत डॉ देशमुख बोरसे गिरी डी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य गोरख देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ सावंत गोरख देशमाने यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिरास भरपूर प्रतिसाद मिळाला शिबिरामध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद च्या तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून योग्य ते उपचार केले या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डी फार्मसी कॉलेजच्या सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

 
Top