उस्मानाबाद /  प्रतिनिधी-

डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी प्राथमिक सुविधा मिळाव्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी प्राचाऱ्यांना निवेदन दिले आहे.  

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,   महाविद्यालयात प्रवेश  घेतल्यापासून आम्हाला पिण्याच्या पाण्याच्या व   शौच्छालयाच्या साध्या प्राथमिक सोयी सुविधा मिळत नाहीत,   LL.B द्वितीय व Pre Law 4th वर्षाचे महाविद्यालय चालू झाले असून  देखील आम्हाला लायब्ररीतुन पुस्तके मिळत नाहीत,  यामुळे  अनेक शैक्षणिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे  महाविद्यालयाचे नाव खराब होत आहे. यासंदर्भात  सर्व विद्यार्थ्यांनी मागील वर्षी आपल्याला याबद्दल निवेदन पण दिले होते पण यावर महाविद्यालयाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे  वरील सर्व सोयीपासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे  विधी विध्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी िनवेदनात  केली आहे. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्ष हे उपस्थित होते.

 
Top