तुळजापूर  / प्रतिनिधी-

 आश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीचरणी पायीवारी सेवा पुर्ण करण्यासाठी तिर्थक्षेञ तुळजापूरकडे येणाऱ्या चोहीबाजूंनी रस्त्यावरून खचखळगे, पाऊस, ऊन, वारा, थंडी याची तमा न बाळगता आई राजा उदो सदानंदीचा उदो उदो चा गजर करीत  लाखो भाविक पायी चालत  तुळजाभवानी नगरीत रविवारी  दाखल झाले होते.

  अश्विनी पौर्णिमा पुर्वसंध्येला पायी भाविकांचे जय्थेच्या जय्थ दाखल होत आहेत. सोलापूर येथुन रुपाभवानी मातेचे दर्शन घेवुन तसेच  , कर्नाटक व आंध्रप्रदेश भागातून तुळजापूरला भाविक प्रचंड संखेने  दर्शनासाठी येतायत . यातील काही भाविक हे सोलापूरातून तर काही भाविक हे ग्रामीण भागातील विविध गावातूनच पायी प्रवास करीत तुळजापूरची वाट दर्शनाच्या ओढाने धरत आहेत  . आई राजा उदो उदो म्हणत दोन वर्षांनंतर आकाशातून होणाऱ्या वरुण राजाची सरी अंगावर झेलत भक्तीमय वातावरणात अश्वीनी  पोर्णिमेला आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक तुळजापुरकडे मार्गस्थ झाले आहेत . 

कोरोनामुळे गेली दोन वर्षे तुळजापूरच्या पायी वारीवर  प्रशासनाने निर्बंध लादले होते . 

घटस्थापनेपासून नऊ दिवस देवीची उपासना केल्यानंतर विजयादशमीनंतर भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी   विजयपूर जिल्ह्यातील भाविक तुळजापूरच्या दिशेने निघाले आहेत . तर शुक्रवारी सकाळपासून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट , गुरुवार आणि शुक्रवार या दिवसापासून होटगी रोड , अक्कलकोट , रोड , विजयपूर सोलापूर रोड मार्गावर तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी जागोजागी   महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे . भाविकांना फळे , चहा , नाष्टाची सोय मोफत करण्यात येत आहे . सोलापूरातील रुपाभवानी मातेचे दर्शन घेउनच तुळजापूरची वाट भाविक धरत आहे. 

 श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानची पोर्णिमा सोमवारी असल्याने व देवी सोमवारी पहाटे देवी १.३०वा .देविजींची  सिंहासनावर प्रतिष्ठापित होणार आहे.     रविवारी  सोलापूर शहरातून प्रचंड संख्येने भाविक तिर्थक्षेञ तुळजापूर पायी चालत दाखल झाले. 

 यंदाच्या वर्षी रविवार ९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा व १०आँक्टोबर रोजी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानची अश्विनी पोर्णिमा आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर भाविकांना पायी चालत जाउन तुळभवानी मातेचे दर्शन घेण्याचा योग आल्याने पायी चालणाऱ्या भाविकांचा उत्साह यंदा ओसांडून वाहताना दिसून येत आहे. भाविकांंची पायी वारी सुसाह्य व्हावी म्हणून तिर्थक्षेञ तुळजापूरकडे येणाऱ्या चोहीबाजुंच्या मुख्य रस्त्यावरून वाहतुक बंद केली आहे. गावोगाव जागोजागी पायी चालत येणाऱ्या भक्तांनसाठी चहापाणी नाष्टा भोजन प्रथमोपचार केंद्रे उघडली आहेत. 

 

 
Top