तुळजापूर  / प्रतिनिधी-

 शेतकऱ्यांना झगडवणा-या नगडवणा-या विमा कंपनीची मस्ती सेना उतरवणार असल्याचे स्पष्ट करुन संकटात सापडलेल्या बळीराजाला न्याय दे असे साकडे घातल्याची माहीती  महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रविवारी श्री  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मिडीयाशी बोलताना िदली.

 बोलताना दानवे पुढे म्हणाले  की, अतिवृष्टी मुळे शेतकरी संकटात सापडला असुन ओलादुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.मी देविला शेतकऱ्यांना न्याय दे आम्हाला काहीही देवु नको परंतु शेतकऱ्यांचा जीव समाधानी ठेव असे देवीचरणी लीन होवुन साकडे घातले.

राज्यात   हजारो  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन जिल्हायात दहा दिवसात ४१शेतक-यांनी या संकटामुळे आत्महत्या केल्या आहेत. आ कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरु केलेले आमरण उपोषण आंदोलन हा विषय जिल्हापुरता मर्यादित नाही तर राज्यांतील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा  प्रश्न आहे.पाटील यांच्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावीच लागेल,असे यावेळी म्हणाले. 

 प्रथमता श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने मंदीराचे जनसंपर्कअधिकारी नागेश शितोळे यांनी देविची प्रतिमा देवुन सत्कार केला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, उपजिल्हाप्रमुख शाम पवार ,   बाळकृष्ण घोडके पाटील,  सुनील जाधव, संजय भोसले, अर्जुन साळुंखे,  प्रतिक रोचकरी , चेतन बंडगर व  शिवसैनिक पदाधिकारीसह उपस्थित होते त्यावेळेस तुळजापूर शिवसेना तालुक्याच्या वतीने  अंबादास  दाणवे  यांचा येथे सत्कार करण्यात आला.


 
Top