उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

 तालुक्यातील दूधगाव येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत 19.50 लक्ष रुपये खर्चातून भव्य व सुसज्ज ग्रामपंचायतीसाठी इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन शनिवारी (दि.15) राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच श्यामसुंदर पाटील दुधगावकर, ग्रामसेविका रेश्मा पवार, उपसरपंच विकास धाबेकर, सदस्य हमीद पठाण, हसन दादामियाँ पठाण, आशा मिटू कसबे, चंद्रकला शिवाजी धाबेकर, बानुबी हमीद पठाण, श्री.धोंगडे इत्यादी ग्रामपंचायत सदस्यासह गावातील विलास धाबेकर, भास्कर धाबेकर, सतीश पाटील, जब्बार पठाण, समीर सय्यद, राजेंद्र चव्हाण, महादेव चव्हाण, संभाजी टेकाळे, महेश धाबेकर, रामदास कसबे, बब्रुवान कसबे, लक्ष्मण झोंबाडे, देविदास कसबे, संतोष माने, महेश धाबेकर, श्रीधर धाबेकर, हर्षल धाबेकर, भारत पाटील, बाळासाहेब पाटील, अमीन मुलाणी, शेख नुरशेख, रकमोद्दीन शेख, आयुब मुलाणी, शहानुर शेख, मुराद शेख, वलिखाँ पठाण, युनूस शेख, जयलानी सय्यद, गणेश धाबेकर, राहुल धाबेकर, तानाजी धाबेकर, बाबा शेख, मिटू कसबे, मशिद पठाण, कादर पठाण, श्रीकांत कदम, बाळू जाधव, आगतराव कसबे, तानाजी कसबे, धनंजय कसबे, कमलाकर गोरे, संतोष धाबेकर, अक्षय धाबेकर आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात दर्जेदार व सोयीनियुक्त इमारत उभारल्यामुळे ग्रामस्थांमधून सरपंचासह ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचे कौतुक होत आहे.


 
Top