उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

नगर परिषदेच्यावतीने शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा आला आहे. ऐन हिंदुंच्या सणासुदीच्या तोंडावर विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणीसाठी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.तसेच   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने नगर परिषदेवर घागर व मशाल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 यावेळी मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर,शहरप्रमुख संजय मुंडे मा.गटनेते सोमनाथ गुरव, मा नगरसेवक राजाभाऊ पवार, रवी वाघमारे, गणेश खोचरे,अक्षय ढोबळे,बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर, बंडू आदरकर, प्रदीप घोणे, रोहित निंबाळकर ,पंकज पाटील,सिद्धेश्वर कोळी, प्रशांत साळुंके,साबीर सय्यद, छोटा साजिद, मुजीब काझी, मनोज केजकर, सुनील गायकवाड, अक्षय माने,नाना घाडगे, बाबू पडवळ, मन्सूर काझी,रोहन गव्हाणे, प्रमोद पवार, दिनेश बंडगर, सुधीर अलकुंटे,महेश लिमये यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top