तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरास दररोज धुवादार पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांनसह नागरिक या पावसाला चांगलेच वैतागून गेले आहेत.

तुळजापूर तालुक्याची पावसाची सरासरी ८३७.४ मिमि असताना  ११०० मिमि इतका विक्रमी पाऊस आजपर्यत झाला असुन अजुनही दररोज सातत्याने पाऊस पडतच आहे.

या पावसामुळे हातातोंडीशी आलेले खरीप पिक हातुन गेल्यात जमा आहे. जमिनाचा वाफसा होत नसल्याने सोयाबीन काडणीस आलेले पिक काढता येणे अशक्य बनले आहे. लवकर नाही काढले तर सोयाबीन बिया उलुन बाहेर गळुन पडण्याची मोठी शक्यता आहे टाकलेले कांदा बी पावासामुळे सडुन जात असुन पिवळे पडू  लागले आहे.दिवाळी आली तरीही पाऊस पडत असल्याने तयारीत व्यतय येत आहे. 


 
Top