तुळजापूर  / प्रतिनिधी-

 अश्विनी पौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र तुळजापुरात पायी चालत येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक व सक्षम केली आहे. भाविकांच्या वाढत्या लोंढयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तुळजाभवानी मंदिराभोवती अत्याधुनिक साधनांसह कवच उभारले होते .

 - 

  नियोजन चोख-  काशीद 

 सहा  ते सात लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरुन बंदोबस्त कार्यान्वित केला आहे. किती ही भाविक  आले तरीही आम्ही  सुरक्षा नियोजन केले असुन भाविकांनी शहरवासियांनी या काळात आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आदिनाथ काशीद यांनी केले आहे.

  100ते १२५अधिकारी १८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात !

आश्विनी पौर्णिमेसाठी १२ उपविभागीय पोलिस अधिकारी ३०  पोलिस निरिक्षक ६०  एपीआय पोलिस व होमगार्ड मिळुन १८०० कर्मचारी यात ४०० महिला कर्मचारी असा बंदोबस्त कार्यान्वित केला आहे. डाँगस्काँड ही येथे कार्यान्वित केले आहे.

तसेच तिर्थक्षेञ तुळजापूरकडे  येणाऱ्या चोही बाजूचा रस्त्यावर पोलिस पाँईट केले असुन सर्वाधिक चार पाँईट तुळजापूर सोलापूर रस्त्यावर टोल नाका, काकाश्री धाबा ,सिंदफळ , घाटशिळ पुल  तसेच नळदुर्ग रोडवर बायपास विश्वसुंदरी हाँटेल मंगरुळ , लातुर रोडवर काक्रंबा, उस्मानाबाद रोड बायपास पुल, बार्शी रोड  ढेकरी येथे पोलिस पाँईट केले आहेत.


 
Top