उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

2022-23 चा 19 चा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम माजी सहकार मंत्री  बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते तर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना, नयी दिल्लीचे अध्यक्ष  जयप्रकाश दांडेगांवर यांचे प्रमुख उपस्थितीत व व्यवस्थापकीय संचालक  प्रकाश नाईकनवरे यांचे उपस्थितीत व  अरविंद  गोरे यांचे अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला. प्रांरभी मान्यवर पाहुण्यांचे हस्ते कारखाना वजन काटयाचे पुजन करुन तद्नंतर गव्हाण पुजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावीक कारखान्याचे संचालक अ‍ॅड. चित्राव गोरे यांनी केले.  प्रकाश नाईकनवरे, जयप्रकाश दांडेगांवर, माजी सहकार मंत्री  बाळासाहेब पाटील, अरविंद   गोरे आदींनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन कारखान्याचे संचालक अ‍ॅड. निलेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कारखान्याचे व्हाईस चेअरमन  विलास  भुसारे यांनी केले. कार्यक्रमास सभासद, शेतकरी, संचालक मंडळ, हितचिंतक, पत्रकार, कामगार, अधिकारी, वाहन ठेकेदार उपस्थित होते.


 
Top