उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष  .चंद्रकांत  पाटील यांच्याबरोबर मराठा समाजाचे आरक्षण व सुविधांबाबत मराठा समाजातील प्रतिनिधींबरोबर बैठक झाली. यावेळी चर्चा करून कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

बैठकीत   मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेचा पाठपुरावा करून लवकर सुनावणी लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निकालानंतरच राज्य मागासवर्ग आयोगाकडील अपेक्षित आरक्षणाची प्रक्रिया सुरू करता येईल.,  आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत देत असलेल्या कर्जासाठी शासकीय थकहमी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला,  प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ५० मुले व ५० मुलींचे वस्तीगृह १ महिन्यात कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असून शासकीय जागा उपलब्ध नसल्यास भाड्याने जागा घेण्यात येईल, सारथी व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांचा लाभ केवळ मराठा समाजातील उमेदवारांनाच घेता येईल, ज्या विद्यार्थ्यांना योजने अंतर्गत वस्तीगृह उपलब्ध होत नाही त्यांना निवासासाठी ओ.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येईल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत व अनुदान देण्याची प्रक्रिया व्यापक करण्याचा देखील निर्णय झाला असल्याचे  आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 


 
Top