उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पहिले ऊस बील (एफआरपीप्रमाणे) त्वरीत देण्यात यावे, या मागणींसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा लढा सुरु असून त्यांनी गुरुवारी (दि.29) राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अतिरिक्त झालेला ऊस उस्मानाबाद जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे सन 2021-2022 जानेवारी ते मे महिन्यांपर्यत पाठविला होता. ऊस पाठवून 5 महिने झाले असून ऊस घेवून जाणार्‍या साखर कारखान्यांनी अद्याप-पावेपर्यंत ऊसाच्या बीलाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे दिलेली नाही. मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ शेतकरी कुटूंबातील सदस्यांनी आर्थिक विवंचणेतून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचे पहिले बील एफआरपीप्रमाणे अद्याप दिलेले नाहीत. अशा कारखान्यांचे साखर विक्री परवाने रद्द करुन साखर गोडाऊन ताब्यात घेवून शासन स्तरावर लिलाव करावा व शेतकर्‍यांचे थकीत पहिले ऊसबील शासनामार्फत त्वरीत वाटप करावे, यासाठी संबधितांना सुचित करण्यात यावे, अशी मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी सहकार मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.


 
Top