उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत रेल्वेचे अधिकारी नकारात्मक उत्तर देत होते. त्यामुळे कोणत्याच  खासदारांचे समाधान होत नव्हते. अखेर  संतप्त झालेल्या खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तर इतर आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला, अशी माहिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.

खा. राजेनिंबाळकरांनी पुण्यात मंगळवारी झालेल्या पुणे व सोलापूर विभागीय रेल्वे समितीच्या बैठकीची माहिती एका व्हिडिओ क्लीपदवारे दिली. खा. राजेनिंबाळकरांनीही या प्रकारावरून रेल्वेच्या अधिकाऱ्यांबाबत  नाराजी व्यक्त केली. ते म्हणतात, की मंगळवारी बैठक होणार असल्याचे पत्र १५ दिवसांपूर्वी आले होते. त्यामुळे विभागातील बहुतांश खासदार आपापल्या मतदारसंघातील रेल्वेच्या समस्या, प्रश्न घेऊन उपस्थित होते. कोरोना तसेच नंतरच्या काळात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदारांना विश्वासात न घेता परस्पर अनेक रेल्वेचे थांबे रेल्वे फेऱ्या तसेच रेल्वेगाड्याही रद्द केल्या आहेत. यावरून सर्वच खासदार प्रश्न मांडत होते. त्यावर सर्वच खासदार नाराज झाले, त्या रागातूनच खा. नाईक निंबाळकर यांनी राजीनामा दिला. त्यातच सोलापूर विभागातील कोरोनापूर्वी रेल्वेची प्रवासी संख्या २५ लाख ३० हजार होती. ती आता म्हणजे कोरोनानंतर सर्व गाड्या सुरू होऊनही आता रेल्वे प्रवासी संख्या घटून १३ लाख ५० हजारांवर आली आहे. याचे कारण विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे अनेक खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार घातला.

रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढविण्यासाठी या रेल्वे नियमित करणे महत्वाचे 

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचा दर्जा कमी असल्यामुळे अिधक सोई सुविधा देता येत नसल्याची माहिती रेल्वे अधिकारीच देतात. त्यामुळे उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढविण्यासाठी कांही रेल्वे गाड्या नियमित करने आवश्यक असताना व या रेल्वे गाड्यास रेल्वे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतानाही या रेल्वे गाड्या नियमित होत नाहीत. कोल्हापूर-नागपूर व पुणे-हैद्राबाद या दोन्ही गाड्या नियमित होने आवश्यक आहे. तरच उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढणार आहे. या रेल्वे गाड्या नियमित करण्याची अनेका मागणी करून ही रेल्वे विभाग मात्र उस्मानाबाद-लातूर-बार्शी  या भागाकडे दुर्लक्ष करीत आहे. 

 
Top