उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरात ‘वैद्यकीय शिक्षण संकुल’ ही अभिनव संकल्पना विकसित करण्यासाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना भेटून संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचे ठरले. यावेळी आई तुळजाभवानीचा महिमा सांगणारी दिनदर्शिका आमदार पाटील यांनी मंत्री महाजन यांना भेट देत संपूर्ण माहिती दिली.

 नवीन शासकीय महाविद्यालयासह वैद्यकीय शिक्षण संकुल विकसित व्हावे ही उस्मानाबादकरांची आग्रही मागणी आहे सदरील एमबीबीएसचे महाविद्यालया पुरते मर्यादित न राहता विस्तार व्हावा हा या मागचा उद्देश आहे. या अनुषंगाने मंत्री महाजन यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली व यावर निर्णय होणे अपेक्षित आहेत असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला.

 उस्मानाबाद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची ३० एकर व त्याजवळील जलसंपदा विभागाची २० एकर अशी ५० एकर जागा या प्रस्तावित संकुलासाठी उपलब्ध करण्यात यावी. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे उस्मानाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या उपलब्ध रिकाम्या जागेत स्थलांतरित करण्यात यावे.

 वैद्यकीय महाविद्यालयाचे नियोजन करत असताना १००० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय व २५० पर्यंतचा विद्यार्थी प्रवेश लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाची रचना व्हावी. यात पदव्युत्तर आणि अतिविषेश पदव्युत्तर अभ्यासक्रम (सुपर स्पेशालिटी) सुरू करण्याचा विचार देखील व्हावा. याची अंमलबजावणी टप्या टप्याने होणार हे गृहीत धरून महाविद्यालयाची इमारत व परिसराचे नियोजन सुरुवातीलाच व्हावे 

 सदर नियोजन करताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा प्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित बृहत आराखडा तयार करण्यास्तव प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करणे आणि याअंतर्गत वैद्यकीय सल्लागारची तरतूद ठेवावी. या संकुलामध्ये वैद्यकीय महाविद्यालयासह दंत महाविद्यालय, भौतीकोपचार, परिचर्या महाविद्यालय यांचा समावेश असणे गरजेचे वाटते अशा वैद्यकीय शिक्षण संकुलाचा प्राथमिक प्रस्ताव बनविण्यात यावा.

 सदरील मागण्या पूर्ण होण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे. सदरील बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, महसूल, जलसंपदा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव व संबंधित अधिकारी तसेच जिल्हाधिकारी,मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी संचालक- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांना बोलाविण्याचे ठरले.


 
Top