उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील अन्न व नागरी पुरवठा विभाग तहसील कार्यालय तुळजापूर यांचे मार्फत तालुक्यातील सर्व रेशन दुकानातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला आनंदाचा शिधा  वाटपात ई पोस मशीन व्यवस्थित चालत नसल्याने आनंदाचा शिधा वाटपात व्यत्यय येत आहे,

 तुळजापूर तालुक्यातुन १९२रेशन दुकानात आनंदाचा शिधा पोहचला असुन तो वाटप सुरु झाला पण रेशन दुकानदार जवळील ई पास मशीन चालत नसल्याने आनंदाचा शिधा वाटपात व्यत्यय येत आहे . तालुक्यातील १९२ रेशन दुकानांमधुन  जवळपास   45 हजार रेशन कार्डधारकांना सदर योजनेचा धान्य लाभ मिळणार आहे.

 
Top